छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar District Bank election: जिल्हा बँकेवर महायुतीचे वर्चस्व; 20 पैकी 19 जागावर उमेदवारांचा विजय

‌‌काँग्रेसचे एकमेव खा. कल्याण काळे यांचा विजयी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत महायुतीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत मतमोजणीला सुरुवात झाली. सर्व उमेदवार व समर्थक मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले होते. अखेर जाहीर झालेल्या अंतिम निकालात महायुतीने 20 पैकी 19 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली.

निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेच्या बिगर शेती मतदारसंघात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी अभिजीत देशमुख यांचा पराभव केला. काळे यांना ४८, तर देशमुख यांना २६ मते मिळाली.

बिगर शेती मतदारसंघातून महायुतीचे अतुल सावे, अंबादास दानवे, रामराव (रामूकाका) शेळके, अर्जुन पाटील आणि रवींद्र काळे हे सर्व पाच उमेदवार विजयी झाले. महिला मतदारसंघातून आमदार अनुराधा चव्हाण यांनी विजय मिळवला. इतर मतदारसंघांतून मुक्ता तांगडे आणि सुवर्णा जाधव विजयी झाल्या. याशिवाय आमदार संजना जाधव, प्रभाकर काळे आणि शेषराव जाधव यांनीही विजय संपादन केला. त्यामुळे संचालक मंडळात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून बँकेवरील सत्ता महायुतीच्या ताब्यात आली आहे.

मुख्यमंत्री ठरवणार अध्यक्ष ; मंत्री अतुल सावे

निकालानंतर मंत्री अतुल सावे यांनी महायुतीच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त केले. आधीच्या आठ बिनविरोध, अशा 20 पैकी 19 जागा ‌ माहितीने जिंकल्या. बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. महायुतीच्या दणदणीत विजयामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांवर या निकालाचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT