रस्त्याने कोयता घेऊन फिरताना आरोपी. पोलिसांनी पकडल्यानंतर विरोध करताना कोयताधारी. Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : रस्त्यावर कोयता घेऊन दहशत

टीव्हीसेंटर भागातील घटना; मनसे पदाधिकाऱ्याने पकडले

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : टीव्हीसेंटरच्या रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला मनसेचे विभाग प्रमुख चंदू नवपुते यांनी एक किलोमीटर पाठलाग करून अखेर पोलिसांच्या मदतीने पकडले. ही घटना मंगळवारी (दि.२३) सायंकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान घडली. गणेश सुभाष सोनवणे (२४, रा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून दोन चाकू व एक कोयता जप्त करण्यात आला.

आरोपी सोनवणे हा टीव्हीसेंटर भागातील एम-२ रोडवर हातात कोयता घेऊन सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोठ्या आवाजात शिवीगाळ करून पायी जात होता. त्याचा राग पाहून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीती पसरली होती. तो आंबेडकरनगर मार्गे पिसादेवीकडे जात होता. त्याचवेळी मनसेचे चंदू नवपुते यांनी त्याचा दुचाकीने पाठलाग सुरू केला. हातात कोयता असल्याने पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्याला पिसादेवी रोडवर पोलिसांच्या मदतीने नवपुते यांनी अडवले. तेव्हा त्याने कोयता शर्टमध्ये लपवून ठेवला.

शस्त्र काढून देत नसल्याने पोलिस अंमलदार आणि नवपुते यांनी त्याला पकडून कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने विरोध करून झटापट केली. अरेरावी करत उत्तरे देत होता. अखेर टोकदार कोयता व पाठीला लावलेला एक लांब चाकू सापडला. त्याला सिडको पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल लेंढे करत आहे.

मैदान बनले नशेखोरांचा अड्डा

टीव्हीसेंटर चौकातील मैदान नशेखोरांचा अड्डा बनले आहे. दिवसा व रात्री दारुडे, नशेखोरांची येथे बैठक असते. त्यामुळे महिला-मुलींना येथून जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT