Chhatrapati Sambhajinagar Crime news  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime news | आईच्या उपचारासाठी गाडी विकायला काढली, जळगावच्या भामट्याने लावला ८ लाखांचा चुना

जळगावच्या भामट्याने लावला ८ लाखांचा चुना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: वाहने खरेदी करण्याच्या किंवा भाडेतत्त्वावर घेण्याच्या बहाण्याने नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा जळगावचा एक सराईत भामटा आणि त्याची टोळी शहरात सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. आईच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी पैशाची नितांत गरज असल्याने तरुणाने स्वतः ची पिकअप गाडी विक्रीस काढली. त्याची गाडी ताब्यात घेत भामट्याने ८ लाखांची फसवणूक केली. तसेच दुसऱ्या एका घटनेत भाडेतत्त्वावर घेत लेली गाडी परस्पर गहाण ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

या दोन्ही प्रकरणी रविवारी (दि.१२) सिडको आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वप्नील समाधान कोळी (रा. गोद्री फत्तेपूर, जि. जळगाव, ह.मु. बजाजनगर) असे या मुख्य भामट्याचे नाव आहेपेपरवर करारनामा करण्यात आला. यावेळी स्वप्नीलने ५० हजार रुपये दिले, ज्यातून १८ हजार रुपयांचा एक हप्ता भरण्यात आला. उर्वरित पैशातून १० हजार रुपये ओमला मिळाले, तर २२ हजार रुपये संदीप जाधव नावाच्या दुसऱ्या एजंटला देण्यात आले.

फसवणुकीचा कट उघडकीस आला

व्यवहार होऊन दीड महिना उलटला तरी स्वप्नीलने गाडी स्वतःच्या नावावर केली नाही आणि बँकेचे हप्तेही भरले नाहीत. ओमने त्याला वारंवार फोन केला असता त्याने प्रतिसाद देणे टाळले आणि नंतर फोन कायमचा बंद करून ठेवला. संशय आल्याने ओमने एजंट आसेफ यांच्याकडे चौकशी केली असता, स्वप्नीलने अशाच प्रकारे गाड्या घेऊन बऱ्याच लोकांची फसवणूक केल्याची समोर आले. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक संजय नरोडे करत आहेत.

फिर्यादी ओम संजय नागले (२३, रा. एन-११ नवजीवन कॉलनी) याच्या तक्रारीनुसार, तो एन-११ भाजीमंडी परिसरात चायनीजचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या आईच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली असल्याने त्याला पैशाची अत्यंत आवश्यकता होती. त्यामुळे त्याने त्याची बोलेरो पिकअप गाडी (एमएच २० डीई ६४१२) विकण्याचा निर्णय घेतला. जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणारे ओळखीचे एजंट आसेफ मोहिन सिद्दीकी यांच्यामार्फत आरोपी स्वप्नील कोळी याच्याशी झाली. ४ मार्च रोजी दुपारी गाडीवरील कर्जासह ८ लाख ११ हजार ९५० रुपयांत सौदा निश्चित झाला. त्यानुसार १०० रुपयांच्या बाँड करारानुसार गाडीचे उर्वरित कर्ज स्वतः च्या नावावर करून पुढील सर्व हप्ते स्वप्नीलने भरायचे होते.

आरोपी स्वप्नील समाधान कोळी (रा. जळगाव, ह.मु. बजाजनगर), संदीप जाधव, नदीम नजमोद्दीन शेख (रा. खुलताबाद) आणि युसूफ शहा या टोळीने फिर्यादी तूफैल शेख मुस्ताक शेख (२९, रा. सिल्कमिल कॉलनी) याची एर्टिगा गाडी (एमएच ०४-जीएम-७६७७) भाड्याने घेतली. त्यानंतर परस्पर युसूफ शहा यांच्याकडे गहाण ठेवून विश्वासघात केला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वैभव मोरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT