Chhatrapati Sambhajinagar News | एरंडाच्या बिया खाल्ल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा! 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News | एरंडाच्या बिया खाल्ल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा!

मळमळ, पोटदुखीचा त्रास; कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : शहरातील हिवरखेडा रोडवरील मदरशातील २३ विद्यार्थ्यांना एरंडाच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी (दी. १६) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तातडीने कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, खबरदारी म्हणून त्यांना रात्रभर वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवारी मदरशाला सुट्टी असल्याने विद्यार्थी परिसरात खेळत होते. यावेळी एका विद्यार्थ्याने बदाम समजून एरंडाच्या बिया खाल्ल्या. त्यानंतर अन्य विद्यार्थ्यांनीही त्या बिया खाल्ल्या. काही वेळातच विद्यार्थ्यांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. हा प्रकार लक्षात येताच मदरशाचे शिक्षक मोहम्मद अलफात यांनी तातडीने सर्व विद्यार्थ्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण पवार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम राजपूत, डॉ. चेतन कुमावत, डॉ. स्वाती डोळस आणि डॉ. ज्योती हिंगणे यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केले.

बाधित विद्यार्थी

फौझजान शेख युसुफ (१२), समीर एम. अंसारी (१२), निहाल शेख भाईमहेमूद (१३), फरहान शेख युसूफ (१३), तोहीद शेख महेमूद (११), इजहार शेख मेनान (१२), बशर शेख आबिद (१३), इमादील शेख अशपाक (१२), सलामान शेख नियाज (११), नवाजीस शेख साहिद (१२), असजद शेख साबीर (१२), गुळफराज शेख आरीफ (१२), आशीर शेख मैतराज (११), खुशदील शेख अशपाक (१४), मुदसीर फिरोज शेख (१६), अरमान स. सलामान (१२), अहमद अती जहागीर (११), राफे शेख रजीशाम (१०), रेहेमानउल्ला सालीक (१५), रहमतउल्ला सदीक (१३), इरफान शेख तनवीर (१४), कमरान शेख तनवीर (१२) आणि जियाउद्दीन नयाजुद्दीन इमामुद्दीन पठाण (१०).

सर्व २३ विद्यार्थ्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना खबरदारी म्हणून रात्रभर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
— डॉ. प्रवीण पवार, बालरोगतज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय, कन्नड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT