Chhatrapati Sambhajinagar Muncipal Corporation file photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Development : विकासकामांसाठी मनपाला ४.७० कोटींचा निधी

२७ कामांना मंजुरी : सभागृहे, क्रीडांगणे, उद्यानासह होणार पथदिव्यांची कामे

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतील नागरी सुविधांची उभारणी आणि सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ४ कोटी ७० लाख रुपयांचा विशेष निधी दिला आहे. या रकमेतून सामाजिक सभागृहे, क्रीडांगणे, उद्याने आणि पथदिवे अशा स्वरूपाची २७ कामे मार्गी लावली जाणार आहेत. नगर विकास विभागामार्फत हा निधी मंजूर झाला असून, कामांची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जाणार आहे.

महापालिकेला शहराच्या विकासकामांसाठी राज्य शासनाने ४ कोटी ७० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. निधीतील सर्व कामांचा खर्च राज्य शासनाकडून केला जाणार असून, अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. या कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच मंजूर कामांची पुनरावृत्ती टाळण्यासह दर्जेदार कामे होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रत्येक कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण केले जाणार आहे. काम सुरू होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रेही जतन करावी लागणार आहेत.

या निधीतून संतोषी माता नगर येथे १५ लाख, पायलट बाबा नगरीत २० लाख, न्यू एसटी कॉलनीत १५ लाख, प्रभाग २४ मधील शिवाजी कॉलनीत १५ लाख आणि ज्ञानेश्वर कॉलनीत २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

चिकलठाणा येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ तसेच दुर्गा कॉलनीतील संत गोरोबा काका मंदिराजवळ प्रत्येकी २० लाख रुपयांची सभागृहे उभारली जातील. प्रभाग २५ मधील विठ्ठलनगर येथे दोन सभागृहांसाठी प्रत्येकी २० लाख, तर प्रभाग २६ मधील राजनगर येथील हनुमान मंदिर आणि जगदंबा माता मंदिर परिसरात प्रत्येकी २० लाख रुपयांची तरतूद आहे.

पथदिव्यांसाठी १.६५ कोटी

प्रभाग २५ मधील विठ्ठलनगरसाठी ३० लाख, श्रीरामनगर, प्रकाशनगर, म्हाडा कॉलनी आणि श्रद्धा कॉलनीसाठी प्रत्येकी १५ लाख रुपये मंजूर आहेत. प्रभाग २४ मधील दोन ठिकाणी अनुक्रमे ३० आणि १५ लाख, प्रभाग २६ मध्ये १५ लाख, तर प्रभाग १० मध्ये १५ लाख रुपये पथदिवे बसविण्यासाठी खर्च केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT