Cheating, physical relations, blackmail and insults; The crime of rape against both
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून ३९ वर्षीय महिलेवर दोन जणांनी वारंवार जबरदस्तीने अत्याचार केले व नंतर जातीवाचक शिवीगाळ करून लग्न करण्यास नकार दिला. प्रकरणात पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आर-ोपींना बुधवारी रात्री अटक केली असून, त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश यू.आर. उबाळे यांनी गुरुवारी (दि.१८) दिले.
शेख अजिम कासिम पटेल (४५) आणि शेख सलीम कासिम पटेल (४८, दोघे रा. बदाम गल्ली, किराडपुरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. प्रकरणात ३९ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी शेख अजीम याने मदतीच्या बहाण्याने पीडितेसोबत ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याने अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केले तसेच पैशाची मागणीही केली. पुढे त्याच्या भाऊ शेख सलीम याच्यासह संगनमत करून दोघांनी पीडितेवर वारंवार अनैसगिंग अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, २६ जून रोजी मध्यरात्री व १० ऑगस्ट रोजी दोघा भावांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तक्रार केल्यास जीव घेण्याची धमकी दिली. यावेळी जातीवाचक शिवीगाळ करून सतत अपमानित केल्याचेही तिने फिर्यादीत म्हटले आहे. प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी बलात्कार, धमकी आणि अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
उपनिरीक्षक खिल्लारे यांनी चौकशी करून आरोपी अजीम व सलीम पटेल या दोघांना अटक केली. दोघा आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक लोकाभियोक्ता के. एन. पवार यांनी आरोपीने पीडितेला धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले. दोघा आरोपींनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. त्यामुळे आर- ोपींची वैद्यकीय तपासणी करायची आहे. गुन्ह्यात आरोपींना आणखी कोणी मदत केली याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.