Crime Against Men Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime: नपुंसकत्व लपवलं, समलैंगिक संबंधांचा संशय... 15 लाखांची मागणी; सुशिक्षित महिलेची पतीविरोधात पोलिसांत धाव

हुंड्यासाठीही छळ; नाशिकच्या १० जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Cheating by marrying an educated woman while hiding impotence

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा:

नपुंसकत्व माहीत असतानाही ती बाब लपवून ठेवून एका ३२ वर्षीय सुशिक्षित महिलेची सासरच्या मंडळींनी क्रूर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर शरीरसुखाला नकार देत नाशिक येथे फ्लॅट घेण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सासरच्या १० जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह २० मे २०२५ रोजी झाला होता. मात्र, लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पतीने नवस असल्याचे कारण सांगून शारीरिक संबंध टाळले. महिना उलटूनही पतीने जवळीक न साधल्याने पीडितेने डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली.

मात्र, आपली कमजोरी उघड होईल या भीतीने पतीने पत्नीला मारहाण करत तिचा मानसिक छळ सुरू केला. धक्कादायक बाब म्हणजे, ही सर्व परिस्थिती सासरच्या इतर मंडळींना ठाऊक असतानाही त्यांनी पीडितेची समजूत काढण्याऐवजी तिला गप्प बसण्यासाठी धमकावले. या प्रकरणी पती, सासू, जाऊ, दीर आणि नणंद अशा एकूण १० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समलैंगिक संबंधांचा आरोप

पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असून, त्यातूनच आपल्याला डावलले जात असल्याचे तिने म्हटले आहे. ६ सप्टेंबर २०२५ रोजी तिला अमानुष मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले. अखेर तिने पोलिसांत धाव घेतली.

पैसे दिले तरच शरीरसुख !

सासरच्या मंडळींनी नाशिक येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरून १५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणले तरच शारीरिक संबंध ठेवू, अशी अजब आणि संतापजनक अट पतीकडून घालण्यात आली. यावेळी पीडितेचे दागिने आणि महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्रेही सासरच्यांनी वळजबरीने काढून घेतली. नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर ५ लाख रुपये देण्यात आले, मात्र त्यानंतरही छळाचे सत्र थांबले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT