Census News : जनगणना कार्याची दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी file photo
छत्रपती संभाजीनगर

Census News : जनगणना कार्याची दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

केंद्र शासनाच्या जनगणना संचालनालयाचे अति. रजिस्ट्रार जनरल संजीव कुमार आणि त्यांच्या पथकाने जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना कार्याची पाहणी केली.

पुढारी वृत्तसेवा

Census Operations Reviewed by Senior Officials from Delhi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या जनगणना संचालनालयाचे अति. रजिस्ट्रार जनरल संजीव कुमार आणि त्यांच्या पथकाने जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना कार्याची पाहणी केली. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे आपली निरीक्षणे नोंदवून सूचना केल्या.

हे पथक दि. २५ पासून जिल्ह्यात दाखल झालेले असून, त्यांनी जालना व छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांत पाहणी केली. त्यांच्या समवेत सह संचालक संदीप राय, जिल्हा समन्वयक पवन गोडे, अलोक विश्वकर्मा, सत्यांशू सिंग आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गौडा यांची व मनपा आयुक्त अमोल येडगे यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली.

निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर आदी उपस्थित होते. संजीवकुमार यांनी निरी क्षणे नोंदविली की, जिल्ह्यात जनगणनेचे कार्य उत्कृष्ट सुरू आहे. प्रगणक अगदी दुर्गम भागातही पोहोचले व त्यांनी गणनेची नोंद केलेली आहे.

महापालिका हद्दीत गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रगणकांना प्रवेशास, नोंदी घेण्यास सुलभता येत नसल्याचे आढळले. त्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना निर्गमित करावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच नागरिकांनी परिपूर्ण माहिती द्यावी, अशीही सूचना त्यांनी केली. जिल्ह्यात अनेक लोक विजेसाठी सौर ऊर्जेचा वापर करताना दिसत आहेत. त्यांची नोंद घेण्यात यावी, अशीही सूचना त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT