Youth Murder Case : सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, गुन्हे शाखेचे पोलिस तळ ठोकून (Pudhari File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Youth Murder Case : सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, गुन्हे शाखेचे पोलिस तळ ठोकून

खून प्रकरण, मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

CCTV footage being examined; Crime Branch police camping at the site

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अज्ञात तरुणाचा खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस कसून करीत आहेत. गुरुवारी (दि.३०) गुन्हे शाखेचे पोलिस व सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी दिली.

सिल्लोड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोकरदन रस्त्यावरील नगरपरिषदच्या पाण्याची टाकीच्या संरक्षक भिंतीजवळ बुधवारी (दि. २९) दुपारी एका पस्तीस वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तर मृताच्या गळा धारदार शस्त्राने चिरलेला असल्याचे दिसून आले.

घटनास्थळी एक कटर सापडल्याने खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. तरुणाच्या हातावर (मीना एके) गोंदलेले असल्याने तो परप्रांतीय तसेच राजस्थानचा असावा, असा कयास पोलिसांचा आहे. पोलिस त्या दिशेने घटनेचा तपास करीत असून, मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत, असल्याची माहिती शामसुंदर कौठाळे यांनी दिली.

परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी विनय सोनवणे, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी प्रमोद भिंगारे व गुन्हे शाखेचे पोलिस या घटनेचा तपास करीत आहे. शहरालगत मोठ्या प्रमाणात कापसाच्या जिनिंगी आहे. तर येथील बहुतांश कामगार परप्रांतीय आहे. पोलिसांनी जिनिंगिंवर जाऊनही माहिती घेत मृत तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले. मात्र अद्याप ओळख पटली नसून, गुन्हे शाखेचे पोलिस तळ ठोकून असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृताच्या हातावर हातावर मीना एके (AK) असे गोंदलेले असल्याने तो परप्रांतीय असावा, असा आमचा कयास आहे. आम्ही राजस्थानसह परराज्यातही ही माहिती दिलेली आहे. ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर या खुनाच्या घटनेचा लवकरच छडा लावून आरोपींना बेड्या ठोकू.
शामसुंदर कौठाळे, पोलिस निरीक्षक, शहर ठाणे सिल्लोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT