Sambhajinagar Crime News : न्यायालयाच्या आदेशाने दीड महिन्यानंतर जैस्वाल पितापुत्रावर गुन्हा दाखल File photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : न्यायालयाच्या आदेशाने दीड महिन्यानंतर जैस्वाल पितापुत्रावर गुन्हा दाखल

बाखरियांची तक्रार घेण्यास क्रांती चौक, सिटी चौक पोलिसांनी केली होती टाळाटाळ

पुढारी वृत्तसेवा

Case registered against Jaiswal father and son after one and a half months on court order

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुकानासमोर पडलेल्या बांधकाम साहित्याच्या कारणावरून उफाळून आलेल्या वादातून ११ ऑक्टोबरला औरंगपुरा भागात चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी तब्बल दीड महिना गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, एवढेच नव्हे तर फिर्यादी मनीष बाखरिया यांनाच उलट आर-ोपीच्या तक्रारीवरून अटक केली होती. अखेर, बाखरिया यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी (दि.३०) क्रांती चौक पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विवेक लक्ष्मण जैस्वाल आणि अनिरुद्ध विवेक जैस्वाल (दोघेही रा. मोहन बिल्डिंग, कुंभारवाडा) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मनीष गोपीचंद बाखरिया (३०, रा. नंदनवन कॉलनी) यांचे कुंभारवाडा येथे महर्षिता एम्पोरियमफ नावाचे दुकान आहे, तर आरोपी विवेक लक्ष्मण जैस्वाल आणि अनिरुद्ध विवेक जैस्वाल (दोघेही रा. मोहन बिल्डिंग, कुंभारवाडा) यांचे समोरच लॉज आहे. रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यावरून २६ सप्टेंबर रोजी आरोपींनी बाखरिया यांना शिवीगाळ करून भांडण केले होते. त्यावेळी आरोपी विवेक जैस्वाल यांचे बंधू विद्यमान आमदार असल्याने मध्यस्थी झाली आणि बाखरिया यांनी तक्रार दिली नाही.

मात्र, ११ ऑक्टोबरला सायंकाळी बाखरिया हे मोबाईल दुरुस्तीसाठी पैठणगेटकडे जात असताना आरोपी विवेक जैस्वाल याने त्यांना जुन्या वादातून अडवले आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला. हातावर वार लागून बाखरिया जखमी झाले आणि लोकांनी त्यांना सोडवले.

पोलिसांकडून टाळाटाळ आणि फिर्यादीलाच अटक

जखमी अवस्थेत बाखरिया सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यांना मेमो देऊन घाटी रुग्णालयात पाठवले. यादरम्यान, क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी उपचार-ाधीन असलेल्या बाखरिया यांनाच थेट घाटीतून अटक केली. बाखरिया यांनी घटनेची हकीकत आणि हाताला टाके पडल्याचे सांगूनही पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. उलट, पोलिसांनी आरोपींशी संगनमत करून विवेक जैस्वालच्या तक्रारीवरून बाखरिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात असतानाही बाखरिया यांची तक्रार पोलिसांनी ऐकली नाही.

न्यायालयात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल

बाखरिया यांनी १२ ऑक्टोबरला न्यायालयात तक्रार नोंदवून घेण्यासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आणि १३ ऑक्टोबरला न्यायालयीन कोठडीत पाठवले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर, न्यायालयाने बाखरिया यांना पोलिसांकडे तक्रार नोंदवून घेण्यासंबंधी अर्ज करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिस आयुक्त कार्यालय, सिटी चौक आणि क्रांती चौक पोलिस ठाण्यात अर्ज करूनही पोलिसांनी जैस्वालविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. यामुळे बाखरिया यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. अखेरीस, न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारी (दि.३०) क्रांती चौक पोलिसांत विवेक जैस्वाल आणि अनिरुद्ध जैस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT