Rickshaw Strike : २३ नोव्हेंबरला रिक्षा बंदचे आवाहन file photo
छत्रपती संभाजीनगर

Rickshaw Strike : २३ नोव्हेंबरला रिक्षा बंदचे आवाहन

रिक्षा पंचायतचा बाईक टॅक्सी विरोधात लढा

पुढारी वृत्तसेवा

Call for a rickshaw strike on November 23

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विना परवाना बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षा पंचायतने राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी केली असून याचाच एक भाग म्हणून २३ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी रिक्षा बंद करण्याचे आवाहन रिक्षा पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे. या बाबत त्यांनी शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी भेट सविस्तर चर्चा केली.

१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात मोर्चा काढला होता. या आंदोलनाची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली. छत्रपती संभाजीनगरमधून सुरू झालेला हा लढा आता राज्यव्यापी बनला असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

२३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध रिक्षा संघटनांच्या वतीने राज्यव्यापी एकदिवसीय रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बाबा कांबळे यांनी शहरातील विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

शहरातील सर्व रिक्षा संघटना या आंदोलनासाठी सक्रिय झाल्या असून, संघटनांनी २३ नोव्हेंबरच्या राज्यव्यापी रिक्षा बंद आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे.

बाईक टॅक्सीच्या विरोधात ठोस कारवाई व्हावी आणि रिक्षाचालकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी आता शहरातील रिक्षाचालक आणि संघटना एकजुटीने मैदानात उतरणार असल्याचीही माहिती कांबळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT