Summer Vacation : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली file photo
छत्रपती संभाजीनगर

Summer Vacation : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

उन्हाळी सुटी : प्रतिदिन एसटीच्या उत्पन्नात दहा लाख रुपयांची भर

पुढारी वृत्तसेवा

Bus stops were crowded with passengers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याच्या सुट्या लागताच अनेक कुटुंबीयांनी शहराबाहेरचा बेत आखला होता. त्यानुसार बसस्थानकासह रेल्वेस्थानकही प्रवाशांनी गजबजून गेले असून, सर्वच मार्गावरील बसना मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे एसटीच्या उत्पन्नात चांगली भर पडली आहे. प्रतिदिन दहा लाख रुपयांच्या उत्पन्नाची भर पडत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

खासगी वाहनांऐवजी सुरक्षित पर्याय म्हणून ओळखली जाणाऱ्या एसटीला प्रवाशांची पहिली पसंती ठरत आहे. परिणामी, एसटीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून दररोज तब्बल दहा लाख रुपयांची अतिरिक्त कमाई होत असल्याची माहिती समोर आली आहे. उन्हाळा म्हणजे शाळा-कॉलेजांना सुट्ट्या, लग्नसराईचा हंगाम आणि पर्यटनासाठी अनुकूल काळ. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे तसेच शहरांमधून पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

या वाढत्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या आहेत. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांदरम्यान तसेच कोकण आणि धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षित बससेवा, शिव-नेरी, आणि साध्या बसेस अशा विविध पर्यायांची उपलब्धता करून देण्यात आला आहे.

जादा बसची सुविधा : प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या वतीने विषेश बसेसद्वारे जादा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा उन्हाळ्याच्या निमित्ताने ३१ जादा बसच्या माध्यमांतून विविध मार्गावर ८९ जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनामुळे सुमारे १३ हजार ३४९ किमीचा अतिरिक्त प्रवास दररोज पूर्ण होत आहे. अतिरिक्त बसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT