Sambhajinagar : गुंठेवारी नसलेल्या मालमत्तांवर चालवणार बुलडोझर, मनपा प्रशासकांचा इशारा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar : गुंठेवारी नसलेल्या मालमत्तांवर चालवणार बुलडोझर, मनपा प्रशासकांचा इशारा

अगोदर वीज कनेक्शन तोडणार नंतर पाडापाडी

पुढारी वृत्तसेवा

Bulldozers will be used on properties without Gunthewari, warns Municipal Administrators

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या ५ हजार बांधकामांवर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले. आता गुंठेवारी नसलेल्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालविण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. त्यासाठी अगोदर नोटीस बजावली जाणार असून, त्यानंतर वीज पुरवठा खंडित करून लागलीच पाडापाडीची मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शहरात महापालिकेने मुख्य ५ आणि अंतर्गत ३ अशा ८ रस्त्यांच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या मालमत्तांविर ोधात नुकतीच मोहीम राबविली. यात सुमारे ४ हजार ८०० हून अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. या कारवाईनंतर आता महापालिकेने शहराच्या विविध भागांतील गुंठेवारी वसाहतीतील बेकायदा बांधकामांकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्व झोन १० कार्यालयांना गुंठेवारी नसलेल्या बांधकामधारकांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले होते.

बेकायदा बांधकामधारकांना नोटीस बजावण्यात आल्या त्याबाबत महापालिकेकडून आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, गुंठेव रीिनुसार बांधकामांचे नियमितीकरण न केलेल्या मालमत्तांवर आता महापालिका कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिला. ते म्हणाले, पहिल्यांदा या बेकायदा बांधकामांचा वीज पुरवठा, नळ कनेक्शन आणि ड्रेनेज कनेक्शन बंद केले जाईल. त्यानंतर बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात येणार आहे, असे प्रशासकांनी सांगितले.

शुल्क सवलत ३० सप्टेंबरपर्यंतच

महापालिकेने गुंठेवारीच्या शुल्कात अगोदर ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली होती. त्यानंतर प्रशासनाने सवलतीची टक्केवारी ५० वरून ३० टक्के केली. आता ही सवलतही ३० सप्टेंबरला संपणार असून, त्यानंतर सवलत दिली जाणार नसल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

१० नव्हे ५ हजारांत प्रस्ताव

गुंठेवारी करण्यासाठी नागरिकांना महापालिकेकडे जो प्रस्ताव दाखल करावा लागतो. तो वास्तुविशारद यांच्यामार्फत मालमत्तेचा आराखडा तयार करूनच केला जातो. त्यासाठी आतापर्यंत वास्तुविशारद १० हजार रुपये प्रतिप्रस्ताव घेत होते, मात्र सध्या हे शुल्क २० हजारांवर पोहोचले आहे. परंतु महापालिकेने अभियांत्रिकी महाविद्यालयांना आवाहन केले. त्यानुसार अभियांत्रिकीचे विद्यार्थी १ हजार चौरस फूट जागेतील मालमत्तेच्या गुंठेव-ारीच्या प्रस्तावासाठी केवळ ५ हजार रुपये घेणार, असे ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT