Broken airport wall turned into garbage dump
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी चोहोबाजूंनी सुरक्षा भिंत व त्यावर काटेरी तार लावण्यात आलेली आहे. मात्र झेंडा चौकाकडून रेल् वेगेट क्रमांक ५६ कडे जाणाऱ्या मार्गावर विमानतळाची एक अतिरिक्त भिंत तुटली असून, परिसरातील नागरिकांनी या जागेचा वापर चक्क कचराकुंडीसारखा सुरू केला आहे. यामुळे येथे पक्षी, मोकाट कुत्रे आणि इतर जनावरांचा वावर वाढला आहे. याचा विमानांच्या उड्नुणाला आणि लँडिंगला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच परिसरातील मांस विक्रेतेही मांसाचे तुकडे आणि टाकाऊ भाग येथे फेकत असल्याने ते खाण्यासाठी पक्षी आणि मोकाट कुर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पक्ष्यांचा वावर वाढला
भिंतीलगत काही हॉटेल चालक आणि नागरिक कचरा, खरकटे व मांसाचे तुकडे टाकत असल्याने येथे विमानांसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यापूर्वीही पक्ष्यांच्या अडथळ्यामुळे विमानांच्या उड्नुण आणि लैंडिंगवेळी अनेक अडचणी आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर विमानतळ प्राधिकरणाने परिसरातील नागरिकांना कचरा न टाकण्याची सक्त ताकीद दिली होती. परंतु रेल्वेगेट ५६ कडील या तुटलेल्या भिंतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा धोका अधिकच वाढला आहे.