छत्रपती संभाजीनगरात उद्या ब्राह्मण अधिवेशन File Photo
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरात उद्या ब्राह्मण अधिवेशन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे रविवारी (दि.३०) छत्रपती संभाजीनगर येथे ब्राह्मण अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शहरातील तापडिया नाट्य मंदिरात सकाळी ९ पासून अधिवेशनला प्रारंभ होणार असून दोन सत्रात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यानिमित्ताने मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

अधिवेशनात पहिल्या सत्रात उद्योजक विवेक देशपांडे, परळी-वैजनाथचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्याहस्ते उद‌्घाटन सोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी, बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशन २००८ चे अध्यक्ष कालिदास थिगळे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, ब्राह्मण सभेचे जालनाच्या उपाध्यक्ष रमेश देहडकर, प्रशासकीय अधिकारी मंजूषा कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

व्दितीय सत्रात समुदायिक सावरकर गीत गायन, परशुराम व रेणुका माता भजन होईल. नाशिकच्या शुक्ल यजुर्वेदिय संस्थेचे कार्यवाह अॅड. भानूदास शौचे हे ब्राह्मण समाज आणि संघटन, छ. संभाजीनगरचे भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांचे आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती, शिवसेना (उबाठा) महानगरप्रमुख राजू वैद्य यांचे ब्राह्मण युवक आणि राजकारण, देवगिरी बँकेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण नांदेडकर यांचे ब्राह्मण समाजासाठी शासकीय कर्ज योजना, अॅड. गोविंद कुलकर्णी यांचे न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ब्राह्मण समाजाचे योगदान आदी विषयांवर विचार मांडणार आहेत. समारोपाप्रसंगी श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज यांच्या ब्राह्मण व संस्कार या विषयाने होईल. दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता सर्व संघटना अध्यक्षांचा सत्कार आणि ठराव मंजूर केले जातील. तसेच ब्राह्मण समाजातील उपोषणकर्ते यांच्यासह विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात येईल. अधिवेशनास समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT