Gold Theft 
छत्रपती संभाजीनगर

Gold Theft Beed Bypass | बीड बायपासवर महिलेचे दोन तोळ्यांचे गंठण ओरबाडले

क्रांती चौकापासून पाठलाग; सातारा परिसरात अंधारात साधली संधी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नातेवाईकांच्या घराचा पत्ता शोधण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेणे एका दाम्पत्याला चांगलेच महाग पडले आहे. मॅप पाहत दुचाकीवरून जाणाऱ्या या दाम्पत्याचा क्रांती चौकापासून पाठलाग करून, बीड बायपास परिसरातील अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण ओरबाडून नेले. ही घटना सोमवारी (दि. २३) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

फिर्यादी ज्योती रवींद्र लाटे (५८, रा. नूतन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, पतीसोबत त्या दुचाकीवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. रस्ता माहित नसल्याने त्यांनी मोबाईलवर मॅप लावला होता. क्रांती चौक, रेल्वे स्टेशनमार्गे ते सातारा परिसरात पोहोचले. मॅपवर दिसणाऱ्या मार्गावरून ते बीड बायपासच्या सर्व्हिस रोडने पुढे जात होते. मात्र क्रांती चौकापासूनच दोन अज्ञात चोरटे स्पोर्ट्स बाईकवरून त्यांचा पाठलाग करत होते.

सर्व्हिस रोडवरील एका पेट्रोलपंपाच्या अलीकडे अंधार असल्याचे पाहून चोरट्यांनी आपली बाईक दाम्पत्याच्या जवळ आणली आणि अवघ्या एका सेकंदात ज्योती यांच्या गळ्यातील २ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. लाटे दाम्पत्याने आरडाओरड केली मात्र चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT