देवीचे विसर्जन करताना बाप- लेकाचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू  
छत्रपती संभाजीनगर

देवीचे विसर्जन करताना बाप- लेकाचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू

देवीचे विसर्जन करताना बाप- लेकाचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू; केहऱ्हाळा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा नदीत देवीचे विसर्जन करताना पाहण्यात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील केन्हाळा येथील बेलेश्वरवाडी येथे शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान अग्रिशमन दलाच्या जवांनानी नदी पात्रात सायंकाळपर्यंत शोध घेतला, मात्र त्यांना बुडालेल्या दोघा बाप-लेकांचा शोध घेण्यास यश आले नाही. अंधार पडल्याने सायंकाळी सात वाजता शोध मोहीम थांबवण्यात आली. सांडू नामदेव सागरे (४५), निवृत्ती सांडु सागरे (२८) रा. बेलेधरवाडी (के- हाळा) असे मृत बाप-लेकांची नावे आहेत.

नवरात्र उत्सवात सालाबाद प्रमाणे त्यांनी घरात देवी बसवलेली होती. शनिवारी देवीचे विसर्जन करण्यासाठी बाप- मृत मुलगा व एक चौदा वर्षांचा त्यांचाच मुलगा असे तिमे पूर्णा नदीत गेले. विसर्जन करण्यासाठी दोघे नदीत गेले. तर चौदा वर्षांचा मुलगा नदीच्या कडेवर थांबला. मृत बाप-लेक नदीतील खडधात गेल्याने ते पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला. ही घटना चौदा वर्षाच्या मुलाच्या लक्षात येताच, त्याने तातडीने घरी येऊन सांगितले.

माहिती मिळतात दत्ता कुडके, हाकिम पठाण, सूर्यभान बन्सोड, संपत पांढरे, लक्ष्मण दुधे आदी नागरिकांनी धाव घेतली, मात्र नदीला पाणी असल्याने शोध लागला नाही. ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. सायंकाळी पाचच्या सुमारास अधिशमन दलाचे जवान दाखल झाले व त्यांनी शोध मोहीम हाती घेतली दोन तास त्यांनी शोध घेतला. मात्र त्यांना यश आले नाही. अंधार पडल्याने सातच्या सुमारास शोष मोहीम थांबवण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तलाठी विशाल पाटील घटनास्थळी दाखल झाले.

वाळू तस्करांचा बळी ?

दरम्यान पूर्णा नदीत बाळू तस्करांनी जेसीपीने मोठ मोठे खड्डे केलेले आहे. यामुळे नदी पात्रात पाण्याचा अंदाज येत नाही. त्यात शुक्रवारी रात्री तालुक्यात जोरदार परतीचा पाऊस झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली होती. यात खड्यातील पाण्यात बुडाल्याने बाप लेकांचा मृत्यू झाला. वाळू तस्करांनी केलेल्या खड्यांनी बाप-लेकांचा बळी घेतला, असा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे. तर या घटनेत नदीच्या कडेवर थांबल्याने सुदैवाने त्यांचा चौदा वर्षांचा मुलगा बचावला.

बेलेश्वरवाडीवर शोककळा

बेलेश्वरवाडीवर बीस-पंचवीस कुटुंब राहतात. सगळीकडे दसरा सण उत्साहात साजरा करताना दुपारी ही दुर्दैवी घटना घडली व बेलेश्वरवाडीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली. मृत सांडू सागरे हे तालुक्यातील गव्हाली येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीवर होते. त्यांचा मुलासह पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सागरे कुटुंब व त्यांच्या नातेवाईकांनावर दुःखाचा डॉगत कोसळला असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT