दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेत्री नम्रता संभेराव pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

BAMU Youth Festival 2026 : केंद्रीय युवक महोत्सवाचे नागराज मंजुळेंच्या हस्ते उद्घाटन

समारोपास अभिनेत्री नम्रता संभेराव यांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव ५ ते ७ ऑक्टोबर या काळात होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार असून समारोपप्रसंगी अभिनेत्री नम्रता संभेराव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. असल्याची माहिती कुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी शनिवारी (दि.३) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हास्तरीय युवक महोत्सव १ ते १२ सप्टेंबर या दरम्यान घेण्यात आले. या महोत्सवातील प्रत्येक कला प्रकारात विजेते तीन संघ केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला डॉ. संजय कवडे यांच्यासह विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, प्रसिद्धी समितीप्रमुख डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती होती. या महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते सोमवारी (दि.५) सकाळी १० वाजता विद्यापीठ नाट्यगृहात होणार आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

यावेळी सिने अभिनेता तथा माजी विद्यार्थी कैलास वाघमारे, प्रकुलगुरु डॉ. प्रवीण वक्ते, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गौतम पाटील, डॉ. योगिता होके पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. तर महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभास महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांची प्रमुख उपस्थिती राहील. समारोप बुधवारी (दि.७) सकाळी १०:३० वाजता होईल.

शोभायात्रेने होणार प्रारंभ : युवक महोत्सवात पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजता शोभायात्रेने प्रारंभ होईल. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यात्रेस हिरवा झेंडा दाखविणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा ते नाट्यगृह अशी ही शोभायात्रा असेल. यासाठी रे पाण्या, अभिजात मराठी अभिमान मराठी, संत गाडगेबाबा १५० वी जयंती, भारतीय ज्ञान परंपरा व महाराष्ट्राची विचारधारा असे पाच विषय देण्यात आले आहेत. या महोत्सावात १०७ संघाचा सहभाग राहणार आहे. महोत्सवात संगीत, नृत्य, नाटय, वाङ्गय व ललित कला अशा पाच गटात २८ कलाप्रकार सादर होणार आहेत, अशी माहिती संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT