मावेजा घोटाळ्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जामीन file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मावेजा घोटाळ्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जामीन

शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सचिन सलगरे यांनी काम पाहिले.

पुढारी वृत्तसेवा

Bail granted to the then District Collector Avinash Pathak in the compensation scam

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बीडमधील गाजलेल्या ६८ कोटींच्या जमीन मावेजा घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी (दि. १४) जामीन मंजूर केला.

पाठक यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर खटल्याच्या मूळ दोषारोपपत्रात आणि पुरवणी दोषारोपपत्रात पाठक यांच्या विरोधात नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुरावे आढळून येत नाहीत. गुन्ह्याचा तपास एकतर्फी केला गेला. कोणत्याही साक्षीदाराने पाठक यांच्या विरोधात कसलेही आरोप केले नाहीत.

साक्षीदाराने जे आरोप केले ते इतर सहआरोपींच्या बाबतीत आहेत. पाठक यांच्यावर कोणीच थेट आरोप केले नाहीत. जी कागदपत्रे आहेत, ती तपास अधिकाऱ्यांकडे आहेत. पाठक यांच्या बाबतीत तपास संपला आहे. त्यांच्याकडे कुठलीही वसुली (रिकव्हरी) बाकी नाही. जी वसुली झाली त्यातून पाठक यांच्याविरुद्ध गुन्हा केल्याचे निष्पन्न होत नाही. साक्षीदारांची यादी पाहता प्रकरण चालणे व संपणे याला प्रदीर्घ कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवणे न्यायोचित होणार नाही.

शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सचिन सलगरे यांनी काम पाहिले. अॅड. देवांग देशमुख, विशाल चव्हाण, प्रसाद राजापूरकर, उबेद हाशमी, मिनल देशमुख, शीतल कार्ले, अश्वीन देशमुख आणि क्षितीज पंडित यांनी अॅड. देशमुख यांना सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT