बबलू मोरे हत्याप्रकरणी सोनवणेच्या टोळीतील आणखी दोघे अटकेत  Pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

बबलू मोरे हत्याप्रकरणी सोनवणेच्या टोळीतील आणखी दोघे अटकेत

बबलू मोरे हत्याप्रकरणी सोनवणेच्या टोळीतील आणखी दोघे अटकेत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिनेश ऊर्फ बबलू मोरे हत्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आणखी दोघांना बुधवारी (दि.४) अटक केली. सुचोध संजय भिसे (१९, रा. एकतानगर) आणि योगेश प्रभाकर जिरे (१८, रा. तक्षशिलानगर, एकतानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मारेकरी गणेश सोनवणे याला सहा महिन्यांपूर्वी बबलू मोरे बाने पर्सनल कारणावरून घरात कोंडून सलग दीड तास रॉडने जबर मारहाण केली होती. यामुळे सोनवणे महिनाभर हॉस्पिटलमध्ये भरती होता. या मारहाणीची सोनवणेच्या मनात प्रचंड भौती बसली होती. बबलू मोरे रोज त्याच्या स्वप्नात यायचा. तो दचकून उठायचा. सोनवणे याने तेव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही, पण मारहाणीचा बदला घेण्यासाठी तो सुडाने पेटून उठला होता. हत्येच्या दिवशी सोन वणे याने बबलू मोरे याला दिवसभर कॉल केले. मात्र बदलू याने त्याला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, हसूल जेलसमोरच्या मैदानावर बबलू मोरेला टोळीने वाद मिटवून घेऊ, असे म्हणत बोलावून घेतले. मोरे हा त्याचे मित्र सुमित चव्हाण, मिलिंद दाभाडे आणि प्रमोद थुने सोबत गेला. तिथे अगोदरच सोनवणेची टोळी वाट पाहत उभी होती.

सोनवणे याने बबलूला आपण वाद मिटवून घेऊ, असे म्हणत गळ्यात हात घालून बाजूला नेत चाकूने भोसकले. सोनवणे आणि अनिकेत यांनी बबलूच्या शरीरात १३ ठिकाणी चाकूने भोसकून सूड उगवला. टोळीतील सुबोध आणि योगेश हेही बबलूवर लाठ्याकाठ्या घेऊन तुटून पडले होते. तर बबलूला वाचविण्यासाठी आलेला सुमित चव्हाण याच्यावरही आरोपींनी चाकूने वार केल्याने तो जखमी झाला आहे. दरम्यान गुन्हे शाखेने सोमवारी मुख्य आरोपी सोनवणे आणि अनिकेत गायकवाड या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या,

बबलूचा सुरू होता शोध

बबलू मोरेला मारण्यासाठी गणेश सोनवणेची टोली सर्वत्र शोध घेत होती. त्या टोळीत अटकेतील अनिकेत गायकवाड, सुबोध भिसे, योगेश जिरे यासह अन्य सदस्य होते. यातील सुबोध हा हातगाडी लावायचा, तर सुवोध शिक्षण घेत आहे. सोनवणे स्वतः रिक्षा चालवायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT