ZP teacher promotion process : झेडपी शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला हायकोर्टाचा 'ब्रेक' file photo
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणूक : गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज अपात्र

दोन वर्षे सदस्यत्व नसल्याचा ठपका; खंडपीठचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Aurangabad District Bank Election: Nomination application of former Gangapur Municipal Council President Sanjay Jadhav rejected

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला. सोसायटीचे दोन वर्षे सदस्यत्व पूर्ण नसतानाही दाखल करण्यात आलेला गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांचा अर्ज उच्च न्यायालयाने अपात्र ठरवला आहे. न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.

गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अर्जावर याचिकाकर्ते रुपचंद लक्ष्मण गाडेकर यांनी आक्षेप घेतला होता. खंडपीठात अॅड. कमलाकर सूर्यवंशी यांच्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी न्यायालयात बाजू मांडली.

भालगाव व्हीकेएसएस सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून प्रतिवादी क्रमांक ४ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याचिकाकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांच्या सदस्यत्वाच्या कालावधी वरून आक्षेप घेतला होता. मात्र, ९ जून २०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते.

प्रतिवादी उमेदवाराचा दावा होता की ते २०१३ पासून सदस्य आहेत, परंतु त्यासंबंधीचा कोणताही अधिकृत आणि पडताळणीयोग्य रेकॉर्ड किंवा मतदार यादीतील नाव न्यायालयात सादर करता आले नाही. न्यायालयाने नमूद केले की, उमेदवाराने २०२५ मध्ये केवळ सदस्यत्व शुल्क भरले असून त्यांचा सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांपेक्षा कमी आहे.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, खंडपीठाने प्रतिवादी उमेदवार संजय जाधव निवडणूक लढवण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करीत गाडेकर यांची याचिका मंजूर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT