Reel star Arun Tupe dies of heart attack  Arun Tupe instagram
छत्रपती संभाजीनगर

Reel star Arun Tupe death: रील स्टार अरुण तुपेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध रील स्टार आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर अरुण तुपे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

पुढारी वृत्तसेवा

Reel star Arun Tupe death

छत्रपती संभाजीनगर: शहरातील प्रसिद्ध रील स्टार आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर अरुण तुपे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनामुळे शहरासह सोशल मीडिया विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

अरुण तुपे हे सोशल मीडियावर रील्स आणि विविध मनोरंजनात्मक व्हिडिओंमुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या व्हिडिओंना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत होती. शहरात त्यांचा मोठा चाहतावर्ग देखील तयार झाला होता. मात्र आज सकाळी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार, चाहते आणि सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

आईच्या किडनीदानाने तरुण मुलास नवे जीवन

छत्रपती संभाजीनगरमध्ये आईचे आपल्या मुलावरील निस्वार्थ प्रेमाचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. ६४ वर्षीय आईने आपल्या ३१ वर्षीय मुलास स्वतःची किडनी देऊन नवे जीवन दिले आहे. किडनी प्रत्यारोप-णाची ही यशस्वी शस्त्रक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल येथे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राहुल रुईकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पार पडली.

किडनी निकामी होण्याच्या गंभीर आजाराने हा तरुण त्रस्त होता. त्यास तीव्र अशक्तपणा, मळमळ आणि युरेमियाची लक्षणे जाणवत होती. त्याच्या आरोग्य तपासणीनंतर किडनी प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णाची ६४ वर्षीय आई स्वतः पुढे येत मुलाचे प्राण वाचवण्यासाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT