Anti-Narcotics Task Force : छत्रपती संभाजीनगरात लवकरच 'अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स'चे कार्यालय  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Anti-Narcotics Task Force : छत्रपती संभाजीनगरात लवकरच 'अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स'चे कार्यालय

ग्रामीण भागातील अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी मिळणार बळ

पुढारी वृत्तसेवा

Anti-Narcotics Task Force office to open soon in Chhatrapati Sambhajinagar

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपूर्वी शासनाने राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या कामाला आता गती प्राप्त झाली आहे. टास्क फोर्समधील ३६४ पदे भरण्यास मान्यता मिळाल्यानंतर नशामुक्त महार राष्ट्र मोहिमेला गती मिळणार आहे. त्याअनुषंगाने टास्क फोर्सचे पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन जागा आणि मनुष्यबळाबाबत सविस्तर नुकतीच चर्चा केली. काही ठिकाणी जागांची पाहणीही करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विभागासाठी स्वतंत्र कार्यालयात सुरू होण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

मागील काही वर्षांत मराठवाडधात ड्रग्जचे कारखाने आणि तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. शहरात बटनची नशा, गांजा, चरस आदी अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोच करणारे पेडलर्स स्थानिक पोलिसांच्या कारवाईत गजाआड झाले आहेत. मात्र, ही साखळी तोडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरातील अमली पदार्थांचे मायाजाल ग्रामीण भागात विस्तारत आहेत. त्याचा विमोड करण्यासाठी आता राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी ३४६ पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला. यासाठी १९ कोटी तर वाहन खरेदीसाठी ३ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली. त्यामुळे टास्क फोर्सचे राज्यात स्वतंत्र कार्यालये काही महिन्यात पाहण्याला मिळणार आहेत.

तीन पोलिस अधीक्षकांची सध्या नेमणूक पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालयात टास्क फोर्सचे प्रमुख (विशेष पोलिस महानिरीक्षक) बसतील. त्यांच्या अधिपत्याखाली पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलिस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली पोलिस अधीक्षक, प्रशासन, पोलिस अधीक्षक अशी रचना असणार आहे. सध्या निकेश खाटमोडे यांच्यासह तीन पोलिस अधीक्षकांना टास्क फोर्समध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीने सहायक पोलीस निरीक्षक झालेल्या १० अधिकाऱ्यांना नुकतीच नियुक्ती मिळाली आहे.

प्रक्रिया प्राथमिक स्तरावर

सध्या टास्क फोर्ससाठी विविध ठिकाणी कार्यालये सुरू करण्यासाठी जागेचा आम्ही शोब घेत आहोत. त्यानंतर मनुष्यबळ अशी बरीच प्रक्रिया होणे बाकी आहे. सध्या सर्व काही प्राथमिक स्तरावर आहे. पोलिस आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या विभागात कार्यालय सुरू होण्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागू शकतात.
- निकेश खाटमोडे पाटील, पोलिस अधीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स

फोर्सला मनुष्यबळ देऊ

अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचे अधीक्षक येऊन भेटले होते. मनुष्यबळ, जागेबाबत त्यांनी चर्चा केली आहे. ते जागेचा शोध घेत आहेत. त्यांना शहर पोलिस दलातून काही मनुष्यबळ देण्यात येईल. आगामी पोलिस भरती प्रक्रियेत शिपाई पदे भरून टास्क फोर्सला वर्ग करून देता येतील.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

पोलिस उपअधीक्षक विभागाचे प्रमुख

पुणे आणि नागपूर असे दोन प्रमुख विभाग करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत पाच उपविभाग करण्यात आले आहेत. पुणे विभागात कोल्हापूर आणि नाशिक तर नागपूर विभागात नांदेड, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे. संभाजीनगर विभागात शहर पोलिस आयुक्तालय, ग्रामीण, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी उपविभागाचे प्रमुख असतील. त्यांच्या अधिपत्यात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अंमलदार असे २५ ते ३० जणांचे पथक कार्यरत असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT