चिमुकल्याच्या घशात बदाम अडकला file photo
छत्रपती संभाजीनगर

चिमुकल्याच्या घशात बदाम अडकला

घाटीत कान नाक घसा विभागातील डॉक्टरांनी दिले जीवदान

पुढारी वृत्तसेवा

An almond got stuck in the little child's throat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

एक वर्षाच्या चिमुकल्याने आईच लक्ष नसताना बदाम गिळला. सुरुवातीला त्याला ७ दिवसांपासून सतत खोकला आणि ताप तसेच दम लागतो म्हणून बऱ्याच खासगी रुग्णालयात दाखवून आला होता. शेवटी त्याला घाटी रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील डॉक्टरांनी त्याला येथील कान नाक घसा विभागप्रमुख डॉ सुनील देशमुख यांच्याकडे तपासणी करून शस्त्रक्रिया करून जीवदान दिले.

भरत (वय १ वर्ष) यांची तपासणी केल्यावर त्याच्या फुफ्फुसात काहीतरी अडकले असल्याची शंका डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

तपासणी करून निदान

त्याची सिटीस्कॅन करून लगेच पहाटे दीड ते दोन वाजता त्याची तत्काळ शस्त्रक्रिया केली. त्याच्या डाव्या फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा दुर्बिणीतून चिमटा टाकून काढून टाकला आणि मुलाला जीवनदान दिले.

घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. यासाठी कान नाक घसा विभागमधील डॉ. सोनाली जटाळे, डॉ. गिरिजा, डॉ कल्याणी, डॉ उत्कर्ष, डॉ. ऋषिकेश यांनी मोलाची मदत केली.

भूल विभागाचे डॉ. गणेश निकम, डॉ. आमेर आणि इतर सर्व निवासी डॉक्टर यांनी मदत केली. ओटी परिचारिका आणि वर्ग ४ कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT