Ambassadors from various countries visit Bibi Ka Maqbara
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : युनेस्को, महाराष्ट्र पर्यटन आणि छत्रपती संभाजीनगर शहर यांच्या सहकार्याने सोपान या कला आणि संस्कृती उपक्रमाने ऐक्यम २०२५ उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवासाठी विविध देशांतील सांस्कृतिक राजदूतांचे शहरात आगमन झाले असून, शनिवारी (दि.२२) सकाळी बीबी का मकबऱ्याला भेट दिली. यावेळी मकबऱ्याच्या सौंदर्याची भुरळ पडल्याचे मत पाहुण्यांनी व्यक्त केले.
राजदूतांनी शनिवारी सकाळी बीबी का मकबरा या ठिकाणी भेट दिली. या दरम्यान या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी ९.३० ते १२ वाजपर्यंत सर्वसामांन्य पर्यटकांसाठी मकबरा बंद ठेवण्यात आला होता. विदेशी पाहुण्यांनी मकबऱ्यांचे सौदर्य जवळून न्याहाळत तेथील छोट्या मोठ्या कलाकुसरीची गाईडकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बीबी का मकबऱ्याचे सौंदर्य डोळ्यात साठवल्याचे सांगत अप्रतिम कलाकृती असल्याचेही सांगितले.
दुपारनंतर वेरूळकडे रवाना
दुपारी १२ वाजेपर्यंत बीबी का मकबरा पाहिल्यानंतर या पाहुण्यांनी दौलताबाद आणि महाराष्ट्रीयन पैठणीसह हिमरू शॉलच्या वर्कशॉपला भेट दिली. यासोबतच दुपारनंतर येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणाचा आनंद लुटत ते पुढे वेरूळ लेणी येथे सायंकाळी आयोजित कार्यक्रमथळी रवाना झाले. सायंकाळी वेरूळ लेणी येथील लेणी क्रमांक १६ कैलास लेणी येथे आयोजित कार्यक्रमाचाही त्यांनी आनंद लुटला.