छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशात धार्मिक तेढ निर्माण केला जातोय, उठसूठ कोणीही मुस्लिम धर्मीयांबाबत बोलत सुटले आहे. त्यामुळे आता त्यांना धडा शिकवा, अशी हाक पाकिस्तानातील जैश ए मोहंमद या अतिरेकी संघटनेनी दिली आहे. या संघटनेच्या जम्मू-काश्मीरमधील हस्तकाच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून तिघांना शनिवारी (दि. ५) पहाटे एनआयए आणि एटीएसच्या पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले होते. मात्र, तिघांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याने त्यांना सायंकाळी नोटीस देत सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुस्लिमांचा देशात द्वेष केला जातोय, त्यांच्या धर्माबाबत उठसूठ कोणीही बोलत आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी दहशतवादी कृत्य करा, अशी हाक पाकिस्तानातील जैश ए मोहंमद संघटनेनी दिली आहे. या संघटनेच्या जम्मू-काश्मीरमधील हस्तकाच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून जालन्याच्या गांधीनगरसह संभाजीनगरातील किराडपुरा आणि अल्तमश कॉलनीतील विघांना शनिवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान धाडसत्र राबवित गुप्तचर विभाग (आयबी) एनआयए, एटीएसच्या तीन पथकांनी ताब्यात घेतले.
सकाळी नऊ वाजेपर्यंत किराडपुरा आणि अल्तमश कॉलनीत कारवाई सुरू होती. या कारवाईदरम्यान गुप्तचर विभाग, एनआयए आणि एटीएसने पहाटे धाडसत्र राबवित घरझडती घेतली. तसेच एटीएस कार्यालयात मोबईलची तपासणी करण्यात आली. त्यातून काहीही हाती न लागल्यामुळे तियांच्या बँक खात्यांची देखील तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातूनही काहीच निष्पन न झाल्यामुळे अखेर तिघांना सायंकाळी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संभाजीनगर एटीएस, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनारात्री बाराच्या सुमारास एटीएसच्या कार्यालयात बोलावण्यात आले. यावेळी तीन पथके नेमण्यात आली. या पथकात आयबी, एनआयए, एटीएस, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेचे कर्मचारी होते. यात तीन महिला पोलिसांचा देखील समावेश होता. पहाटे तीनच्या सुमारास पथके कारवाईसाठी रवाना झाली. किराडपुरा आणि अल्तमश कॉलनीचे रस्ते पहाटेपासून सील करण्यात आली होती. यानंतर दरवाजा ठोठावत एके-४७ पिस्टलसह पथके घरात शिरली, जालन्यात एका भंगार व चमड़ा विक्री करणार्या व्यावसायिकाच्या घरावर छापा मारून युवकास ताब्यात घेतले होते. भल्यापहाटे करण्यात आलेल्या या कारवाईप्रसंगी स्थानिक पोलिसही बंदोबस्तासाठी हजर होते.
पोलिसांनी सय्यद मौलाना आणि शेख अब्दुल यांच्या घरात छापा मारल्यानंतर सुरुवातीला सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले. त्यानंतर घराची तपासणी करण्यात आली. दोघांना ताब्यात घेताना एनअ एच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना एका तासात चौकशी करून सोडून देऊ असे आश्वासन दिले. तसेच कुटुंबीयांना मारहाण, धमकावणे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा व्हिडीओ घेण्यात आला.