Adhik Maas : महिनाभरात भांडी बाजारात सुमारे पाच कोटींची उलाढाल file photo
छत्रपती संभाजीनगर

Adhik Maas : महिनाभरात भांडी बाजारात सुमारे पाच कोटींची उलाढाल

अधिक मास : सोने-चांदीच्या महागाईमुळे जावयाला भांड्याचे वाण

पुढारी वृत्तसेवा

Adhik Maas: Gift of metal vessels to the son-in-law due to the high cost of gold and silver

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महिनाभरापासून अधिक मासानिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी (दि.१४) या अधिक मासाचा समारोप झाला. या महिन्यात लेक-जावयाला कपडे, भांडी, भेटवस्तू देण्यात आले. सोने व चांदीचे वाढते भाव पाहता यंदा तांबे, पितळ व स्टीलची भांडी भेट देण्यात आली. यामुळे शहरातील भांडी बाजारात महिन्याभरातच सुमारे पाच कोटींवर उलाढाल झाल्याचे भांडी व्यापारी नीलेश जैन यांनी सांगितले.

हिंदू धर्मशास्त्रात मुलगी व जावयास लक्ष्मीनारायण स्वरूप मानले जाते. त्यामुळे जावयासह ब्राह्मण, देव, गुरू यांना दान देण्याला महत्त्व आहे. बदलत्या काळातही लेक जावयाला वाण देण्यासाठी अद्यापही तांब्याच्या भांड्यांनाच पसंती दिली जाते. अलीकडच्या काळात जावयाला देण्यात येणाऱ्या भेटवस्तूच्या स्वरूपात काहीसा बदल झालेला असलातरी अद्यापही तांब्याची भांडी व कपडे भेट देण्यास 'अधिक' पसंती दिली.

बाजारात वाण देण्यासाठी तांब्याचे घंगाळे, आकर्षक दिवे, निरांजन, तबक, घागर, नक्षीदार ताह्मण, श्री विष्णुची मुर्ती, गाय- वासरू, ताट, ग्लास, वाटी, प्लेट, जग यांना अधिक मागणी दिसली. त्यात तांब्याचे ताम्हण तीनशे रुपयांपासून, तांब्या दोनशे रुपयांपासून, घागर - सहाशे रूपयांपासून उपलब्ध होते.

दीपदानाला महत्त्व

अधिक मासात अन्य दानाबरोबरच दीपदानाला मोठे महत्त्व असल्याने भांडी बाजारात वेगवेगळ्या आकारातील आकर्षक दिव्यांना मागणी होती. अवघ्या पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या आकारातील आकर्षक दिवे खरेदी करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT