निवडणूक काळात गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार कारवाई file photo
छत्रपती संभाजीनगर

निवडणूक काळात गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार कारवाई

सपोनि ईश्वर जगदाळ; पोलिसांचे पथसंचलन

पुढारी वृत्तसेवा

Action will be taken against those who commit malpractices during the election period

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काळात गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांची कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असून, निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी (दि.३१) बालानगर, ढोरकीन, पिंपळवाडी पि. इत्यादी गावांमध्ये पोलिस पथकाने पथसंचलन केले.

निवडणुकीदरम्यान शांतता

सुव्यवस्था भंग करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने ड्रोन कॅमेराचा वापर केल्या जाणार आहे. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोउनि दशरथ बुरकुल, कविता जगताप, सिंगल, राहुल मोहतमल, अमोल पवार, ज्ञानेश्वर भवर, अंकुश राहटवाड, रामेश्वर पंडित, जीवन गुडेकर, रागिणी कदम, नंदा बिरुटे यांच्यासह आ.र.सी.पी. पथक जवान सहभागी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT