Property Tax : कर न भरल्यास मालमत्तेवर कारवाई अटळ file photo
छत्रपती संभाजीनगर

Property Tax : कर न भरल्यास मालमत्तेवर कारवाई अटळ

सहा हजार थकबाकीदारांना महापालिकेचा इशारा : आठवड्यातून दोन दिवस विशेष मोहीम

पुढारी वृत्तसेवा

Action against property inevitable if taxes are not paid

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कर न भरल्यास महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तीन वेळा नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या सुमारे सहा हजार मालमत्ताधारकांवर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. संबंधित मालमत्ता सील करणे, मालमत्तेवर बोजा नोंदविणे आणि घरातील वस्तू जप्त करणे असे पर्याय प्रशासनाकडून वापरले जाणार आहेत. यासाठी दर गुरुवार आणि शनिवारी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे शुक्रवारी (दि. १६) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.

कर वसुलीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत सुमारे ९० हजार मालमत्ताधारकांनी कर भरला असून, महापालिकेला ८६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर थकबाकी अद्याप वसूल होणे बाकी असल्याने प्रशासनाने कारवाईवर भर देण्याचे ठरविले आहे. वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्यांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने झोननिहाय कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे. यात मालमत्ता सील करणे, बोजा चढविणे तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छ मुख्य प्रशासकीय इमारत घरातील वस्तू जप्त करण्याचा समावेश आहे. एकीकडे ८६ कोर्टीची वसुली झाली असली, तरी उर्वरित थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाला आता प्रत्यक्ष कारवाईतून परिणाम साधावा लागणार आहे.

आत्तापर्यंत राबवण्यात आलेल्या वसुली मोहिमेत झोन ५ आणि झोन १० मधील वसुली समाधानकारक असल्याचे आढाव्यात दिसून आले आहे. या भागांत तुलनेने चांगल्या प्रमाणात कर जमा झाला आहे. मात्र, झोन १ आणि झोन ३ मध्ये वसुलीचा वेग कमी असल्याने या विभागांसमोर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आहे. आयुक्त येडगे सर्व वॉर्ड अधिकारी आणि कर वसुली लिपिकांच्या कामाचा नियमित आढावा घेत आहेत. थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवतानाच, थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे.

गुरुवार, शनिवार कारवाईचे दिवस महापालिकेच्या वतीने थकबाकीदारांना यापूर्वी अनेकदा सूचना देण्यात आल्या आहेत. तीन वेळा नोटिसा बजावल्यानंतरही कर न भरल्याने आता पुढील कारवाईची तयारी करण्यात आली आहे. दर गुरुवार आणि शनिवारी होणाऱ्या विशेष मोहिमेत थकबाकीदारांच्या मालमत्तांवर कारवाई केली जाणार आहे. यात मालमत्ता सील करणे, बोजा नोंदविणे तसेच घरातील वस्तू जप्त करण्याचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT