अतिक्रमण हटाव, होर्डिंगवरील कारवाई सुरु ठेवावी File Photo
छत्रपती संभाजीनगर

अतिक्रमण हटाव, होर्डिंगवरील कारवाई सुरु ठेवावी

महापालिका आयुक्तांचे आदेश : माजी आयुक्तांनी सुरू केलेल्या योजना सुरू ठेवा

पुढारी वृत्तसेवा

Action against encroachments and hoardings should be continued

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम व बेकायदा होर्डिंगवरील कारवाई सुरूच ठेवावी यासह माजी आयुक्त जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेले उपक्रम आणि योजना प्रभावीपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश शुक्रवारी (दि.१०) आयुक्त अमोल येडगे यांनी प्रशासनाला दिले. विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाने कामकाजात सातत्य ठेवून नागरिकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी प्राधान्याने करावी, यावर भर दिला.

महापालिकेकडून शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू असून, या मोहिमेअंतर्गत पाच प्रमुख मार्गावरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला. ही मोहीम यापुढेही सुरूच ठेवावी, असे आदेश शुक्रवारी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले. तसेच अद्यापही शहरातील काही प्रमुख मार्ग, चौक आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण जैसे थे आहे.

त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी नियमित आणि नियोजनबद्ध कारवाई करत अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सातत्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विविध विकासकामे आणि नागरिकाभिमुख योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

दंडात्मक कारवाईचे निर्देश

याचबरोबर अनधिकृत होर्डिंगविरोधातील कारवाईही अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमबाह्य पद्धतीने उभारलेले फलक शहराच्या सौंदर्यावर परिणाम करत असून, अपघातांचा धोकाही वाढत आहे. अशा होर्डिंग्ज तातडीने हटवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT