वैजापूर : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. कंटेनरला ट्रॅव्हल्स बस येऊन धडकली. या अपघातात २० जण जखमी झाले असून त्यातील ४ जण गंभीर जखमी आहेत. आज (दि. ९) पहाटे ५ वाजता वैजापूरजवळ हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५ वाजता वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर संभाजीनगरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्स बसमधील २० प्रवासी जखमी झाले. जखमींवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ४ गंभीर जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.