Walaj Murder News
नगर रोडवर सुरक्षा रक्षकाचा अज्ञात मारेक-याने दगडाने ठेचून खून केला.  Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

वाळूजमध्ये सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून

पुढारी वृत्तसेवा

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : नगर रोडवरील बजाज कंपनीसमोर असलेल्या ट्रक बॉडी रिपेरींग वर्क्स दुकानावरील सुरक्षा रक्षकाचा अज्ञात मारेक-याने दगडाने ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना आज (दि.८) सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आली.

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज

भाऊसाहेब नामदेव पडुळकर (रा. श्रद्धा कॉलनी, वाळूज) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. घटनास्थळी जाळपोळ झाल्याचे दिसून आल्याने ही घटना वाद-विवादातून घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

SCROLL FOR NEXT