A retiree was robbed while taking a morning walk
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मॉर्निंग वॉक करणाऱ्या सेवानिवृत्त दोन वृद्ध मित्रांना चौघांच्या टोळीने पोलिस असल्याची बतावणी करून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि.३) सकाळी साडेआठच्या सुमारास जालना रोडवर, रामनगर भागात घडली. विशेष म्हणजे तोतयांचा एकही गुन्हा उघड करता न आल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी बतावणीचा मुद्दा झाकून केवळ लुटल्याचा गुन्हा दाखल केल्याचा अजब प्रकारही समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. तोतयांच्या टोळीने २ तोळे सोन्याचे दागिने लुबाडून नेले.
फिर्यादी बाबूराव विठ्ठल लहाने (७४, रा. मुकुंदवाडी) हे कृषी सहायक म्हणून निवृत्त आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते मित्र देसाई जाधव यांच्यासह मॉर्निंग वॉकसाठी विमानतळाकडे गेले होते. तेथून परत येऊन जालना रोडवरून विठ्ठलनगरकडे वळत असताना वडाच्या झाडाजवळ त्यांना दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी अडवले. एकाने देसाई यांना शिंदेचे लग्न कोठे आहे? असे विचारण्याचा बहाणा करून बाजूला नेले.