छत्रपती संभाजीनगर

Electricity Problems : सिल्लोडच्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा

महावितरणला कालबद्ध कृती आराखड्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

A permanent solution to Sillod's electricity problems

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा: शहरातील वाढत्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. शहरातील वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होणे, जीर्ण वीज खांब, लोमकळलेल्या व तुटलेल्या वीजवाहिन्या, कमी क्षमतेचे रोहित्र आदी प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली.

नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रभागातील वीज समस्या कालबद्ध आराखड्यानुसार सोडविण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिले. शहराच्या वीज व्यवस्थेचा सर्वंकष आराखडा तयार करून आवश्यक कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वीज खांबांचे स्थलांतर, लोमकळलेल्या वीजवाहिन्या उंच करणे, नवीन वीज खांब व रोहित्र उभारणे, झाडांच्या फांद्यांमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सुरक्षित, अखंड आणि दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी महावितरणने प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, महावितरणचे सहाय्यक अभियंता धम्मपाल म्हस्के, नगरसेवक रऊफ बागवान, शेख इम्रान गुड्डू, सिद्धेश्वर आहेर, आसिफ बागवान, राजश्री निकम, डॉ. फिरोज खान, शेख बाबू भिकन, जुम्माखा पठाण, रईस मुजावर, सुधाकर गायकवाड, अकील वसईकर, किशोर अग्रवाल, सत्तार हुसेन, अशोक बन्सोड, शेख बाबर, सुनील दुधे, शेख कय्युम, अशोक बन्सोड, गौरव सहारे तसेच नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी, महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT