A mobile toilet has been provided temporarily for the passengers and staff as the toilet at CIDCO bus stand is being repaired
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको बसस्थानकावरील स्वच्छतागृहाची दुरुस्ती सुरू असल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, या फिरत्या शौचालयां भोवतीच घाण पाणी असल्याने सुविधेऐवजी गैरसोयीचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आडोसा शोधण्याची वेळ आली आहे.
बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवाशांना स्वच्छतागृहाची सुविधा अत्यावश्यक आहे. मुख्य स्वच्छतागृहाची दुरुस्ती सुरू असल्याने - पर्यायी व्यवस्था म्हणून फिरते शौचालय ठेवण्यात आले. मात्र, त्याची नियमित स्वच्छता आणि परिसरातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने शौचालयर भोवती दुर्गंधीयुक्त घाण पाणी साचले आहे.
या घाण पाण्याच्या दुर्गंधीमुळे शौचालयांपर्यंत जाणे प्रवाशांसाठी धोकादायक आणि त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी शौचालयाचा वापर करण्याऐवजी बसस्थानक परिसरात आडोसा शोधताना दिसत आहेत. एकीकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात त्याचा वापरच करताना प्रवाशांसह कर्मचाऱ्यांच्याही नाकी नऊ येत असल्याची स्थिती आहे.
बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांची योग्य देखभाल होणे अपेक्षित आहे. फिरते शौचालय उभारल्यानंतर त्याच्या आजूबाजूला सांडपाणी साचणास नाही, याची व्यवस्था करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने साचलेल्या घाण पाण्याचा निचरा करून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे
सुविधेऐवजी गैरसोय
सुरू मुख्य स्वच्छतागृहाची दुरुस्ती
पर्यायी व्यवस्था म्हणून फिरते शौचालय
फिरत्या शौचालयांभोवती घाण पाणी
दुर्गंधीमुळे प्रवाशांची गैरसोय
वेळ प्रवाशांना आडोसा शोधण्याची
सांडपाण्याचा तातडीने निचरा करण्याची गरज