A married woman ended her life, fed up with harassment from her in-laws.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फळ विक्रीच्या व्यवसायासाठी माहेरहून ७ लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसीक छळ सुरू होता. या छळाला कंटाळून विवाहितेन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ डिसेंबर रोजी रात्री किदवईनगर नायगाव रोड (भिवंडी ठाणे) येथे घडली.
या प्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अरबाज सलिम शेख, सासू सायरा शेख, भाया अलिम शेख (सर्व रा. किदवईनगर, भिवंडी, ठाणे) यांच्याविरुद्ध हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयशा अरबाज शेख (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आयशाची आई नुरजहा शेख रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशाच्या पतीसह सासरची मंडळी माहेरहून व्यवसायासाठी ७ लाख रुपयांची मागणी करत होते. ही मागणी पूर्ण करत नसल्याने तिचा छळ सुरू होता.
प्रकृती ठीक नसल्याने १३ नोव्हेंबर रोजी पतीसोबत माहेरी आली. दरम्यान पतीने फोनवरून पैसे न आणल्यास दुसरे लग्न करीन, अशी धमकी दिली होती. या छळामुळे तिने २५ डिसेंबर रोजी रात्री आयशाने गळफास घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोटात होती जुळी बाळे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आयशाच्या पोटात जुळी अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. एका बाजूला नव्या पाहुण्यांच्या आगमनाची चाहूल असताना, दुसऱ्या बाजूला सासरच्या छळामुळे आयशा कमालीची खचली होती. अखेर २५ डिसेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास, आपल्या लहान मुलाला आईजवळ सोडून तिने बेडरुममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.