छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरून वाहने घेऊन मुंबईकडे जाणारा भलामोठा कंटेनर पलटी होऊन थेट दोन्ही लेनवर आडवा झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३१) रात्री अकराच्या सुमारास सावंगी इंटरचेंजपासून पंधरा किलोमीटर अंतरावर घडली. यात वाहनचालक किरकोळ जखमी झाला. तर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
नागपूरहून कार उत्पादक कंपनीची वाहने घेऊन कंटेनर समृद्धी महामार्गावरून जात होता. तो मुंबई कॉरिडॉर वरून सरळ लेन सोडून नागपूर कॉरिडॉरवर पलटी झाला. कंटेनरचा वरचा भाग हा नागपूर कॉरिडॉर वर आडवा झाल्यामुळे वाहतूक काही वेळेस साठी ठप्प झाली होती. नागपूरकडे प्रवास करणाऱ्या कार चालकांनी वाहन थांबवून कंटेनरच्या चालकाला बाहेर काढले आहे. समृध्दी महामार्गावरील वाहनधारकानी समृद्धी महामार्गाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर समृद्धी महामार्गावर एमएसएफचे पथक व रुग्णवाहिका दाखल झाली . या अपघातात वाहन चालक हा किरकोळ जखमी झाला आहे.