A case has been registered against 8 people for creating a disturbance on the street.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एकमेकांना धक्काबुक्की करून गोंधळ घालणाऱ्या ७ ते ८ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर शहाबाजार परिसरात घडली.
या प्रकरणी शेख अबुजर शेख अकबर, शेख अनवर शेख अकबर (रा. शहाबाजार), इरफ उमर शेख, शेख जावेद शेख उस्मान (रा. फातेमानगर, हर्सल), इम्रान उमर शेख, अभय विनायक वाहुळ, यश किशोर गायकवाड (दोघे रा. शहाबाजार), तसेच एक अनोळखी व्यक्ती अशी गोंधळ घालणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिटीचौक पोलिस ठाण्यातील अधिकारी सहकाऱ्यांसह हद्दीत गस्त घालत होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शहाबाजार परिसरात काही लोक रस्त्यावर धक्काबुक्की करत गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधितांना पांगवले तर काहींना ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक फौजदार पाटील करीत आहेत.