छत्रपती संभाजीनगर

कन्नड : अंबाडी प्रकल्पालगत विहिरीत पडून ३५ वर्षीय मजुराचा मृत्यू

Shambhuraj Pachindre

कन्नड; पुढारी वत्तसेवा : तालुक्यातील अंबाडी धरणात आंबा ग्रामपंचायतीचे विहिरीचे काम सुरू आहे. तेथे काम करत असताना रंजीत उर्फ राजु लाला राठोड (वय ३५ रा. सातकुंड ता.कन्नड) या मजुराचा विहिरीतील माती दगड, गोटे ढासळल्याने मृत्यू झाल्याची घटना आज (दि.३०) दुपारी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अंबाडी मध्यम प्रकल्पात आंबा ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठाच्या विहिरीचे खोदकाम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. नेहमीप्रमाणे कामगार काम करताना अचानक माती व दगड राजू राठोड यांच्या अंगावर पडल्याने ते ढिगाऱ्याखाली दबले गेले. इतर मंजुरांनी तात्काळ त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. यानंतर त्यांना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध गायकवाड यांनी तपासून मयत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध गायकवाड यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. कन्नड शेअर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत सोनवणे दिनेश खेडकर करत आहे.

दि. १५ मे रोजी तालुक्यातील मुंडवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचारी रविंद्र दगडु झावरे (३५) यांचा अंबाडी धरणातील मुंडवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत विद्युत पंपाचा पाईप जोडत असताना अचानक तोल गेल्याने विहिरीत पडुन पाण्यात बुडुन मुत्यु झाल्याची घटना घडली होती पंधरा दिवसात विहिरीत पडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

SCROLL FOR NEXT