तीन वर्षांत शहर हद्दीतील ९ हजार रुग्ण क्षयमुक्त file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : तीन वर्षांत शहर हद्दीतील ९ हजार रुग्ण क्षयमुक्त

संशयितांचा शोध, निदानासह जलद उपचाराने टीबी निर्मूलनाच्या दिशेने

पुढारी वृत्तसेवा

9,000 Patients Within City Limits Become TB-Free in Three Years

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक मिनिटाला दोन व्यक्ती क्षयरोगाने बाधित होत असल्याने शहर हद्दीत मागील तीन वर्षांत ९ हजार १०२ रुग्ण क्षयरोग (टीबी) मुक्त झाले आहेत. संशयितांचा शोध, निशुल्क निदान, जलद उपचार आणि जनजागृतीमुळे शहराची टीबी निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्व जगाला या आजाराची माहिती व्हावी यासाठी पाळला जातो. भारतामध्ये प्रत्येक मिनटाला दोन व्यक्ती क्षयरोगाने (बेडका दूषित) बाधित होतात. धुंकी दूषित असलेल्या एका क्षयरुग्णामुळे वर्षभरामध्ये इतर १०-१५ जणांना क्षयरोगाचा संसर्ग होतो.

शहरात मनपा हद्दीत मागील तीन वर्षांत ११ हजार ८० क्षयरोगी आढळून आले आहेत. या वर्षी आतापर्यंत म्हणजेच २३ मार्च २०२६ पर्यंत ८२० क्षयरोगी आढळून आले आहेत. या क्षयरोग्यांना त्वरित प्रत्यक्ष देखर 'खीखाली जलद औषधोपचार देण्यात आल्याने यापैकी तब्बल ९ हजार १०२ क्षयरोगी बरे होऊन क्षयरोग मुक्त झाले आहेत. तर, या तीन वर्षांत ४६५ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

-शंभर दिवस टीबी मुक्त अभियान जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने शंभर दिवस टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने अति जोखमीची लोकसंख्या घेणार असून त्यातील लोकांची स्क्रीनिंग म्हणजेच क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे यात एक्सरे व नॅट तपासणी होणार आहे.
-डॉ. प्रेरणा संकलेचा, शहर क्षयरोग अधिकारी, मनपा.

मोफत औषधोपचार, पोषण आहार

टीबी मुक्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व क्षयरुग्णांना बेडका तपासणी व औषधोपचार मोफत उपलब्ध दिले आहे व इतर सुविधा दिलेल्या आहेत. तसेच निक्षय पोषण योजनेंतर्गत उपचार संपेपर्यंत दरमहा मानधन व फूडचे वाटपही केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT