चार महिन्यांत धावल्या ८६३ लालपरी pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

चार महिन्यांत धावल्या ८६३ लालपरी

विद्यार्थी सहल : विभागातून एसटीला सुमारे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न

पुढारी वृत्तसेवा

863 ST buses ran in four months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शालेय सहलींचा हंगाम सुरू होताच विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज झाली होती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विभागातून तब्बल ८६३ एसटी बस विविध शाळांच्या सहलींसाठी धावल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

शालेय मुलांच्या सहलीचे नियोजन दरवर्षी केले जाते. सहलीसाठी शाळांकडून लालपरीची मागणी केली जाते. त्यानुसार एसटी महामंडळाच्या वतीने सहलीसाठी बस उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात मोठ्या प्रमाणावर सहली काढल्या आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत आणि सुरक्षित प्रवास यासाठी एसटीची मागणी मोठी असते. या चार महिन्यांत विविध शाळांकडून ८६३ एसटी बसच्या माध्यमांतून सहली पार पडल्या. उन्हाळी सुटीतही सहलींची मागणी वाढण्याची शक्यता असून, एसटी प्रशासनाने त्यासाठी नियोजन सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सहलीत लांब पल्ल्याच्या प्रवासात विश्रांतीची व्यवस्था, तसेच शाळांच्या वेळापत्रकानुसार बस उपलब्ध करून दिल्या होत्या. सहलींच्या माध्यमातून एसटीला चांगला आर्थिक फायदा झाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या चार महिन्यांत धावलेल्या ८६३ बसमधून एसटीला सुमारे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. उन्हाळी सहलीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी एसटीने आतापासूनच नियोजनाची तयारी सुरू केली आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पसंती

छत्रपती संभाजीनगरमधून विविध शाळांनी काढलेल्या सहलीत प्रामुख्याने कोकण किनारपट्टी समुद्रकिनारे, किल्ले तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना पसंती दिली. महाबळेश्वर, गणपतीपुळे, कोल्हापूर, सातारा परिसरासह विविध पर्यटनस्थळांकडे सहली काढण्यात आल्या होत्या. निसर्गरम्य घाटरस्ते, समुद्रकिनाऱ्यांची सफर आणि ऐतिहासिक वारसा यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT