छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिजली ६५०० किलो खिचडी, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एमजीएमच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय आणि सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १४) शहरात तब्बल ६५०० किलोची प्रोटीनयुक्त खिचडी तयार करण्याचा विक्रम करण्यात आला. या विक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.

एमजीएम परिसरातील एमजीएम क्लोव्हर डेल स्कुल ग्राउंडवर हा उपक्रम घेण्यात आला. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्यायनिर्णय प्रमुख रेखा सिंग, शेफ विष्णू मनोहर, अनुराधा कदम, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्यायनिर्णय प्रमुख रेखा सिंग यांच्या हस्ते आयएचएमचे संचालक डॉ. कपिलेश मंगल यांनी ६५०० किलोची विश्वविक्रमी खिचडी केल्याचे पदक आणि प्रमाणपत्र स्वीकारले. ही तयार केलेली खिचडी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरातील वृद्धाश्रम, अनाथालये, वसतिगृहे, हॉस्पिटल आदी ठिकाणी वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची लेले व वैष्णवी पाटील यांनी केले, तर आभार डॉ. कपिलेश मंगल यांनी मानले.

या उपक्रमावेळी, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, विजया देशमुख, डॉ.एच.एच. शिंदे, डॉ. प्राप्ती देशमुख, डॉ. जॉन चेल्लादुराई, उपकुलसचिव डॉ. परविंदर कौर धिंग्रा, संचालक डॉ. कपिलेश मंगल यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पुष्पा गोरे, वैभव जोशी, डॉ. रूपेश भावसार, डॉ. सिंधु सांगूळे अमित पवार,बिदिशा रॉय, प्रवीण मुचक,अरोही झाडे, भाग्यश्री मठदेवरु,अभिषेक श्रीवास्तव, गोरखनाथ औताडे व किचन टीम यांनी परिश्रम घेतले.

एमजीएम विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी ६५०० किलोची तयार केलेली खिचडी हा उपक्रम जगातील एकमेव आहे. विद्यार्थ्यांचा हा उत्साह व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. शेफ विष्णू मनोहर यांच्यातील कौशल्ये हे पाहण्यासारखे होते. यापुढे खिचडीची ओळख राष्ट्रीय डिश म्हणून होईल.
– रेखा सिंग, न्यायनिर्णय प्रमुख, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स

खिचडी बनविण्याचा जगामध्ये प्रथम विक्रम २००० साली झाला. २०२३ या साली एमजीएम विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंट संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तांदूळ, विविध डाळी व भाज्या आणि तुपासह विविध १९ घटकयुक्त व्हेजीटेबल खिचडी तयार करून नवा विश्वविक्रम केला आहे.
– विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT