61,000 Caste Certificates Issued Based on Hyderabad Gazette: Vikhe Patil
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागील सहा महिन्यात मराठवाड्यात ६१ हजार कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत, हैदराबाद गॅझेट लागू झाले नसते तर या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकली नसती, असा दावा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.
अंतरवाली सराटी येथे जाण्याआधी विखे पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, न्या. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे.
मागील तीन वर्षात मराठवाड्यात ३ लाख २ हजार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली. त्यात मागील सहा महिन्यांचा म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतरची आकडेवारी पाहिली तर ६१ हजार प्रमाणपत्र दिली गेली आहेत. आज याबाबत सविस्तर आढावा घेतला. काही ठिकाणी जात प्रमाणपत्र देण्यात अधिकारी दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
प्रमाणपत्र वाटपासाठी आपण त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समित्या अधिक सक्रिय करण्याचे तसेच या समितीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करुन प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. गावोगावी दवंड्य देणे, ग्रामसभांमधून आवाहन करण आदी पद्धतीने हे काम केले जाईला आगामी काळात याबाबत एक विशे मोहिम राबविली जाणार आहे, असेह विखे यांनी सांगितले.
कन्नड येथील प्रांत अधिकास्यान एका जात प्रमाणपत्राबाबत दिरंगा केल्याचे समोर आले. मागील वर्षभरापासून तिथे अर्जावर कार्यवाह झालेली नाही. त्यामुळे या प्रांन अधिकास्यावर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत, अस ते म्हणाले.
हैदराबाद गॅझेटनंतरचे दाखले वाटप
छत्रपती संभाजीनगर : ३९६६, जालना ३३६३, परभणी: ५०२१,
: ३६९६, नांदेड : ४६०, बीड : ३९६१४, लातूर : ४३७, धाराशीव :
एकूण : ६१२३० हिंगोली ४६७३