Graduate Constituency Election : पदवीधरच्या मतमोजणीसाठी ५०० अधिकारी-कर्मचारी तैनात file photo
छत्रपती संभाजीनगर

Graduate Constituency Election : पदवीधरच्या मतमोजणीसाठी ५०० अधिकारी-कर्मचारी तैनात

अचुकता, पारदर्शकतेवर भर, जी. श्रीकांत यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

500 officers and staff deployed for counting of votes in graduate constituency election

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी ५०० अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना गुरुवारी वंदे मातरम सभागृहात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेत मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि सांघिक भावनेने काम करावे, असे निर्देश त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले.

वैध-अवैध मतपत्रिकांचे मार्गदर्शन

प्रशिक्षणात मतमोजणी प्रक्रियेचे विविध टप्पे, कामानुसार जबाबदाऱ्यांचे वाटप, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये, वैध आणि अवैध मतपत्रिका निश्चित करण्यासंदर्भातील तरतुदी यांची माहिती देण्यात आली. तसेच मतमोजणी करताना कोणत्या बाबी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकारी विजय गौंडा जी.सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या निवडणुकीत एकूण ४१ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी विभागात ८४२ केंद्रे सज्ज केले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुमारे ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केले आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीतील प्रत्येक टप्पा नियोजनबद्ध आणि नियमांनुसार पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. जी. श्रीकांत म्हणाले की, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणारे अधिकारी व कर्मचारी सक्षम आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामाची जबाबदारी व्यवस्थित समजून घेऊन ती चोखपणे पार पाडावी, असेही आयुक्त म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT