Sambhajinagar Fraud Case : पेट्रोल पंपासाठी पैसे द्या, अधिक परतवा देतो म्हणत वृद्धेकडून ४० लाख हडपले  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Fraud Case : पेट्रोल पंपासाठी पैसे द्या, अधिक परतवा देतो म्हणत वृद्धेकडून ४० लाख हडपले

तिघांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

40 lakhs looted from elderly man, saying he will give more in return for petrol pump

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पेट्रोल पंपासाठी जागा डेव्हलप करून पंप लवकर सुरू करण्यासाठी पैसे द्या, जास्त परतावा देतो असे असे गोड बोलून एका महिलेसह तिघांनी वृद्धेला ४० लाख रुपयांचा गंडा घातला. पंप सुरू झाल्यानंतरही रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. मिर्झा यास्मीन बेगम मिर्झा बिस्मिल्ला बेग, बिसमिल्ला बेग कयुम वेग (रा. डिलक्स अपार्टमेंट), अजमत बेग कयुम वेग (रा. मिलकॉर्नर) अशी आर-ोपींची नावे आहेत.

फिर्यादी जकिया बेगम अब्दुल्ला खान (६७, रा. कोहिनूर कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती अब्दुल्ला खान यांच्या नावावर रावरसपुरा येथे १८ गुंठे जमीन आहे. यातील ६२५ चौमी जमीन मिर्झा यास्मिन वेगम मिर्झा बिस्मिल्ला बेग यांना पेट्रोल पंप टाकण्यासाठी दिलेली आहे.

मिर्झा कॉलनीतच राहत असल्याने त्यांच्याशी यांचा परिचय आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते जकिया यांच्या घरी आले. पेट्रोल पंपाची जागा डेव्हल्प करून पंप सुरू करण्यासाठी ४० ते ५० लाख रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम तुम्ही दिली तर पंप लवकर सुरू होईल. तुमची it रक्कम दोन महिन्यांत परत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

परतावा करताना थोडी जास्त रक्कम परत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आमिषापोटी त्यांच्या खात्यातून नोव्हेंबर २०२३ ला १५ लाख रुपये मिर्झा यांच्या खात्यावर आरटीजीएस केले. त्यानंतर मुलगी उझमा परवीन यांच्या बँक खात्यातून १५ लाख रुपये आरटीजीएस द्वारे वर्ग केले. यानंतर खान हुसना परवीन मोहम्मद यांच्या खात्यातून दहा लाख रुपये आरटीजीएस द्वारे दहा नोव्हेंबर २०२३ ला मिर्झा यास्मिन यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. असे एकूण ४० लाख रुपये त्यांना दिले.

त्यानंतर पेट्रोल पंपाची टाकी, डिलिव्हरी स्टॅन्ड, पाईपलाईन शेड ही सर्व कामे झाली. फेब्रुवारी २०२४ मध्ये पेट्रोल पंप सुरू देखील झाला. यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांना रक्कम परत करण्याबाबत बोलणे झाले. आताच पंप सुरू झाला आहे, इतरांचे पैसे देणे आहे. तुम्ही घरचेच आहात, थोडं थांबा असं म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. परंतु ही रक्कम परत न दिल्याने प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT