Marathwada News : मराठवाड्यातील धरणात ३४ टक्के पाणीसाठा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada News : मराठवाड्यातील धरणात ३४ टक्के पाणीसाठा

जायकवाडी २९ टक्क्यांवर : पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

यंदा मान्सून वेळेअधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मात्र मराठवाड्यात अद्यापपर्यंत बरसलेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील धरणांची स्थिती सामन्य आहे. जोरदार वरसलेल्या अवकाळी पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत अत्यअल्प प्रमाणात वाढ झाली आहे. ६ जून रोजी मराठवाड्यातील धरणात ३४ टक्के पाणी साठा आहे.

यात जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात केवळ २.९८ टक्क्याने वाढ झाली असून, सध्या धरणात २९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरण भरले होते. त्यामुळे यंदा तीव्र पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र आजघडीला अनेक वाड्या-वस्त्या टँकरच्या भरवशावर अवलंबून आहेत. काही गावांत पाण्यासाठी महिलावर्गाला पायपीट करावी लागत आहे.

उपयुक्त साठ्यातही मोठी घट

सद्यस्थिती ११ प्रमुख धरण मिळून ६३.५१ टीएमसी म्हणजेच १७७८.२९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी हा साठा तब्बल २१.८८ टीएमसी म्हणजेच ६१९.७२ इतका होता. यंदा अद्याप मान्सून बरसलेला नसून, गेल्या अनेक दिवसांपासून विभागातील अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

मोठ्या पावसाची प्रतीक्षा

जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील बहुतेक धरणांतील पाणी पातळी सामन्य आहे. त्यामुळे मोठा पाऊस होईपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT