32 groups of Zilla Parishad reserved for women
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद गटांच्या आर-क्षणाची सोडत सोमवारी पार पडली. यामध्ये ६३ गटांपैकी ३२ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. ओबीसीसाठी १७, अनुसूचित जातीसाठी ८ आणि अनुसूचित जमातीसाठी ३ गट आरक्षित असणार आहेत. आजच्या सोडतीत अनेक मातब्बरांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना राजकीय धक्का बसला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, एकनाथ बंगाळे, तहसीलदार दिनेश झांपले आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोडतीसाठी जिल्हाभरातील इच्छुकांनी सभागृहात गर्दी केली होती. स्नेहा वाघ या चिमुकलीच्या हाताने चिठ्ठया काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.
जिल्ह्यातील ६३ गट असून, यामध्ये ३५ जागा सर्वसाधारण प्रवर्गामध्ये आहेत. यामध्ये १७ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या. यात महिलांसाठी नऊ जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी आठ जागा राखीव करण्यात आले. यामध्ये चार जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. तसेच अनुसूचित जमाती तीन जागा आरक्षित असून दोन जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदविण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. १७नागरिकांना १४ ऑक्टोबरपासून १७ऑक्टोबरपर्यंत उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांच्याकडे आपल्या हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पन्नास टक्के गट महिलांसाठी आरक्षित २२ करण्यात आले. तरीही आरक्षण २३ सोडतीला मात्र फक्त पुरुषांचीच उपस्थिती होती.
गोंधळामुळे जिल्हाधिकारी संतापले
आरक्षण सोडतीवेळी एकेक चिड्डी काढून आरक्षित गटांची नावे जाहीर केली होती. या प्रक्रियेदरम्यान समोर उपस्थित इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये सतत कुजबूज सुरू होती. शिवाय अनेक जण आपापसांत मोठ्याने बोलत होते. वारंवार आवाहन करूनही वातावरण शांत होत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी चांगलेच संतापले. तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य होणार आहेत, तुम्हाला हे शोभते का ? अरे तुम्हाला दहा मिनिटे शांत राहता येत नाही. तुम्हाला शांत बसायचे नसेल तर मी सोडत थांबवितो, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर सभागृहात शांतता पसरली.