३ हजार तरुणांना मिळणार जर्मन भाषेचे प्रशिक्षण file photo
छत्रपती संभाजीनगर

३ हजार तरुणांना मिळणार जर्मन भाषेचे प्रशिक्षण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातून १० हजार युवकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी जर्मनीला पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तीन हजार तरुणांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाद्वारे त्याची तयारी करण्यात येत आहे.

जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग आणि भारतातील महाराष्ट्र राज्यात कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत करार झाला आहे. महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात दहा हजार युवकांना रोजगार मिळेल असे सांगण्यात येते. शालेय शिक्षण विभागासह उच्च शिक्षण विभागाने यासाठी तयारी केली. शिक्षण विभागाने पुढाकार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून सुरुवातीला शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण द्यायची प्रक्रिया सुरू केली.

आता नोकरीची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्याची जबाबदारी आता विद्यापीठांवर असणार आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. या विद्यापीठांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या समन्वयाची जबाबदारी नव्यानेच स्थापन झालेल्या कौशल्य विकास विद्यापीठावर सोपविण्यात आली आहे.

याबाबतची बैठक नुकतीच मुंबईत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. दहा हजार तरुणांपैकी ३ हजार जणांना भाषेचे ज्ञान देण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर असेल. प्रशिक्षण कार्यक्रम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT