कीर्तनाला जात असताना भक्तांवर काळाचा घाला; ३ जागीच ठार, ४ जखमी  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

कीर्तनाला जात असताना भक्तांवर काळाचा घाला; ३ जागीच ठार, ४ जखमी

पुढारी वृत्तसेवा

किनगाव : अहमदपूर-अंबाजोगाई महामार्गावर दगडवाडी गावाजवळ टाटा सुमो जीप व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री ८ च्या दरम्यान घडली. या घटनेत दोन महिला व एका ४ वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले.

अहमदपूर तालुक्यातील मोहंगाव येथील सिरसाट भावकितील काही जण बीड जिल्ह्यातील जोडवाडी येथे कीर्तनासाठी निघाले होते. सुमो गाडीत लहान मुलांसह सात जण होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली. कीर्तनासाठी जात असताना वाटेत ट्रकला पाठीमागून गाडीने जोराची धडक दिल्याने अपघात झाला.

या अपघातात दोन महिला व एका चारवर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली तर चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT