Sambhajinagar News : ऑरिकच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २,४५० कोटी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : ऑरिकच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २,४५० कोटी

बिडकीनमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणार

पुढारी वृत्तसेवा

₹2,450 crore for the second phase of AURIC

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या (ऑरिक) विस्तारीकरणाला आता मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडने (एमआयटीएल) बिडकीन येथील सेक्टर 'बी' आणि 'सी' (पॅकेज-ए) मधील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तब्बल २,४५० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. यामुळे संभाजीनगरसह मराठवाड्यातील औद्योगिक गुंतवणुकीला नवे बळ मिळणार आहे.

बिडकीन औद्योगिक वसाहतीत टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यूसह अनेक मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहे. अनेकांचे काम अंतिम टप्यात असून, काहींचे उत्पादनही सुरु झाले आहे. या कंपन्यांचे वेंडर्सकडूनही उद्योग कार्यान्वित करण्याची लगबग सुरू आहे. या सर्व लहान-मोठ्या उद्योगांना दर्जेदार रस्ते, अखंडीत वीज आणि पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयटीएलकडूनही 'ईपीसी' (डिझाइन, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वयन) तत्त्वावर करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २,४५० कोटी (जीएसटी आणि संचालन व देखभाल खर्च वगळून) इतका निश्चित करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदार नियुक्त झाल्यानंतर ३६ महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यापासून पुढील ४ वर्षे संबंधित कंत्राटदारावरच प्रकल्पाचा दोष दायित्व कालावधी (डीएलपी) आणि संचालन व देखभालीची जबाबदारी असणार आहे.

इच्छुक निविदाकारांसाठी १३ नोव्हेंबरपासून निविदा कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्री-बिड बैठक पार पडणार असून, १८ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता तांत्रिक निविदा उघडल्या जातील.

अशी असतील प्रमुख कामे

या निविदेअंतर्गत बिडकीन सेक्टर बी आणि सी मध्ये उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहेः

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT